प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यात जी शिवरात्रि येते तिला महाशिवरात्री असे म्हटले जाते.
महाशिवरात्री ह्याचा अर्थ मोठी शिवाची रात्र, शिवाची ध्यान मन लावून शिवाच्या सान्निध्यात लिन होण्याची रात्र असा मला समजलेला अर्थ लावण्यात काही हरकत नाही.
श्रुष्टि च्या प्रारंभी ह्याच रात्री महादेव शिव ब्रह्मा पासून रुद्र च्या रूपात अवतरित झाले होते.
सांसारिक माणसे ह्या शिवरात्रीला शिव आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याने जोडतात.
योगी माणसे ह्या शिवरात्रीला शिवाने बरीच वर्षे तपस्या केल्यानंतर ते कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस मानून ह्या दिवशी विशेष साधना प्रयोग करतात.
एका मान्यतेनुसार ह्याच दिवशी भोलेनाथ शिव आपल्या ६४ शिवलिंगी रूपात प्रकट झाले त्यातले फक्त आपण १२ शिवलिंगाचे दर्शन करू शकतो. बाकी अजून त्याचा शोध लागलेला नाही.
वेगवेगळ्या प्रांतात त्या त्या मान्यतेनुसार शिवाची उपासना महाशिवरात्रीला करण्याची पद्धती आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.