रोजगार संगम योजना महाराष्ट्र | मिळणार ५००० रोजगार भत्ता । Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024

नमस्कार मित्रानो , आज मी तुम्हाला रोजगार संगम योजना महाराष्ट्र (Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024) याविषयी माहिती सांगणार आहे . हि माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे . चला तर मग बघूया काय आहे हि योजना. 

अनुक्रमणिका

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

तर मित्रानो २०२४ मध्ये आपल्या राज्यातील माननीय एकनाथ शिंदे सरकार यांनी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोजगार संगम योजना महाराष्ट्र सुरु केलेली आहे. (Rojgar Sangam Yojana Maharashtra Information in Marathi)

या योजने अंतर्गत प्रत्येक बेरोजगाराला दर महिन्याला रुपये ५०००  रोजगार भत्ता म्हणून मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे? या योजनेचे उद्दिष्ट्ये काय? तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही form कुठून आणि कसा भराल याची माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. 

रोजगार संगम योजना महाराष्ट्र उद्दिष्ट्ये | Rojgar Sangam Yojana Maharashtra Objective

१) रोजगार संगम योजना महाराष्ट्र या योजने द्वारे बेरोजगारांना आर्थिक सहाय्य्य मिळवून देणे .

२) या योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी मिळवून देणे. 

३) महाराष्ट्रातील अकुशल बेरोजगारांना चांगली नोकरी मिळविण्याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

४) बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्द करून देणे 

५) महिलांना देखील त्यांच्या स्थानिक पातळीवर नोकरी उपलब्द करून देण्यात येणार आहे. 

रोजगार संगम योजना महाराष्ट्र पात्रता आणि अटी । Rojgar Sangam Yojana Maharashtra Eligibility

रोजगार संगम योजना महाराष्ट्र या योजनेसाठी लागणारी पात्रता खालील प्रमाणे आहे. 

  • हि योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली आहे त्यामुळे अर्थातच या योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. 
  • इतर कोणत्याही राज्यातील रहिवासी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
  • अराजदाराचे वय हे १८ ते ४० दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करणारा किमान इयत्ता ५ वी उत्तीर्ण असला पाहिजे.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र आवश्यक कागदपत्रे । Rojgar Sangam Yojana Maharashtra Important Documents

रोजगार संगम योजना महाराष्ट्र यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे. 

  • अर्जदाराचे महाराष्ट्रातील रहिवासी प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड
  • EWS प्रमाणपत्र
  • Bank Passbook
  • Mobile Number
  • Email ID 

रोजगार संगम योजना महाराष्ट्र लाभ आणि विशेषता । Rojgar Sangam Yojana Maharashtra Benifits

  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र लाभ खालीलप्रमाणे आहेत.

१) बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविते. 

२) खाजगी क्षेत्रात रोजगार उपलब्द करून देण्यासाठी प्रोत्साहन देते. 

३) प्लेसमेंट मधून रोजगार मिळविण्यासाठी रोजगार भत्ता उपलब्द करून देते . 

  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र विशेषता  खालीलप्रमाणे आहेत.

१) रोजगार संगम योजना महाराष्ट्र हि योजना फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्यांकरिता लागू करण्यात आलेली आहे. 

२) पात्र उमेदवारास निवड झाल्यानंतर online exam देणे गरजेचे आहे.

३) निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

४) प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना प्लेसमेंट साठी देखील साहाय्य करण्यात येईल. 

या योजनेसाठी तुम्हला online registration करावयाचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्या website वर जायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया.  

रोजगार संगम योजना महाराष्ट्र ऑनलाईन । Rojgar Sangam Yojana Maharashtra Online Registration:

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register

  • रोजगार संगम योजना महाराष्ट्र या योजनेचा अर्ज भरण्यासाठी  महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत website वर जाऊन तुम्हाला या योजनेसंबंधीत सर्व माहिती मिळणार आहे. 
  • या website वर आल्यानंतर sign up करून आवश्यक ती माहिती भरून आपली नोंदणी करून घेता येईल. 
  • त्यानंतर या योजनेचा अर्ज तुमच्या समोर प्रदर्शित होईल. 
  • अर्ज भरताना तो काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. आवश्यक ती सर्व माहिती तुमचा नाव, पत्ता तसेच शैक्षणिक पात्रता सर्व माहिती व्यवस्थित भरवि लागेल.  
  • अर्ज भरताना मोबाइल OTP पाठविण्यात येतो त्यामुळे अर्ज भरताना मोबाइलला जवळ असणे गरजेचे आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर submit य button वर click करायचे आहे. 
  • अर्ज भरताना काही चूक झाली असेल तर submit करण्याआधी recheck करा व लगेच चूक दुरुस्त करून घ्या आणि submit या option वॉर click करा. 

अशा प्रकारे तुमचं रोजगार संगम योजना महाराष्ट्र २०२४ या योजनेमध्ये registration पूर्ण होईल. 

रोजगार संगम योजना महाराष्ट्र आढावा । Rojgar Sangam yojana Maharashtra Overview

योजनेच नावरोजगार संगम योजना महाराष्ट्र
यांनी सुरू केलेसीएम एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्रातील लोक
उद्दिष्ट्येबेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे
Registration modeऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index
हेल्पलाइन नंबर1800-233-0066

माहिती आवडली असेल तर नक्की share करा व इंतारांपर्यंत हि माहिती पोहोचावा. 

धन्यवाद!

 FAQ: Rojgar Sangam Yojana Maharashtra बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रोजगार संगम योजना रजिस्टर केल्यावर किती पैसे मिळणार?

या योजनेत अर्जदारास प्रत्येक महिन्याला ५०००/- रुपये मिळणार आहेत.

रोजगार संगम योजने अंतर्गत पैसे कुठे जमा होणार?

या योजने अंतर्गत पैसे दार महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार.

अर्जदार जर महाराष्ट्र राज्यातील नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल का?

रोजगार संगम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. 

Leave a Comment

error: Content is protected !!